जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बालाघाटाच्या युवकांची अर्धनग्न पदयात्रा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

लोकगर्जनान्यूज
सिरसाळा : मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीत पुन्हा मराठा आरक्षण आंदोलन सुरू केले . याच्या समर्थनार्थ कान्नापूर ( ता. धारुर ) या बालाघाटातील युवकांनी रविवार ( दि. १८ ) पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न पदयात्रा काढली. ही पदयात्रा मंगळवारी ( दि. २० ) बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण याबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेत सगे सोयरे मराठा आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आगळे वेगळे अंदोलन करुन कान्नापूरच्या युवकांनी लक्ष वेधले आहे . दिनांक १८,१९ व २० फेब्रुवारी असे पदयात्रा अंदोलनाचा तीन दिवसीय कार्यक्रम आहे. कान्नापूर येथून पदयात्रा सुरू झाली, सिरसाळा – दिंद्रूड -तेलगाव – वडवणी – घाटसावळी – ढेकणमोहा ,राजुरी ते थेट बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मंगळवारी ( दि. २० ) दुपारी १२ वाजेपर्यंत पदयात्रा धडकणार आहे. अर्धनग्न पदयात्रा असल्याने या अंदोलनाने शासन /प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.शेकडो युवक यामध्ये सहभागी झाले असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी अनेक गावातील मराठा समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पदयात्रा मोठं रुप घेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.