राजकारण
जयदत्त क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज मागे

बीड (प्रतिनिधी)
दि.१ : बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रंगत आली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. अशातच जयदत्त सोनाजी क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
बीड विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकूण १३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी एकूण ३ उमेदवारांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये नेहा संदीप क्षीरसागर, अर्चना अनिल जगताप यांच्यासह जयदत्त सोनाजी क्षीरसागर यांचा समावेश आहे. तसेच, १३ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.