क्राईम

बीड – थाटात लग्न करुन नवरी घरी आणली …. अर्ध्या तासात असं काही घडलं की, सर्वांना बसला धक्का!

लोकगर्जनान्यूज

बीड : मुलीच्या आईकडे लग्नाला पैसे नसल्याने नवरदेवाने दोन लाख रुपये दिले. मोठ्या थाटामाटात लग्न करुन आनंदात नवरी घरी आणली. घरी आल्यावर अवघ्या अर्ध्या तासात असं काही घडलं की, सर्वांनाच धक्का बसला आहे.

ही गोष्ट आहे बीड तालुक्यातील देवी बाभुळगावाची जवळच्या मित्राने स्थळ आणलं मुलगीही सुंदर आहे पण तीच्या आईकडे पैसे नसल्याचे सांगितले तरीही तानाजी जोगदंड मित्रावर विश्वास ठेवून दोन लाख रुपये मुलीच्या आईला देऊन म्हणत लग्नासाठी तयार झाला. सोगळे सोपस्कार पार पडले, हा तरुण वैवाहिक आयुष्याचे स्वप्न रंगवत होता. दि. २० नोव्हेंबरला माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे थाटामाटात लग्न झाले. मोठ्या आनंदात नवरी देवी बाभुळगाव येथे घरी आणली. येथे आल्यानंतर केवळ अर्ध्या तासात नवरीने शौचालयाचे कारण सांगत दागिन्यांसह घराच्या बाहेर पडली अन् तेथून ती पसार झाली. वाट पाहूनही नवरी येत नसल्याने शोधाशोध केली परंतु ती कुठेच आढळून आली नाही. त्यामुळे फसगत झाल्याचे लक्षात आले. या घटनेने नवरदेव व कुटुंबाला धक्का बसला. अर्ध्या तासात नवरीने पळ काढल्याची बातमी समजताच गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तानाजी भारत जोगदंड यांनी काल नेकनूर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावरून मित्र असलेला आरोपी लक्ष्मण युवराज ढास, प्रिया युवराज ढास दोघे रा. घारगाव ( ता. बीड ), शितल भिमराव धुमाळ रा. राज पिंपरी ( जि. औरंगाबाद ) मुलीची आई, मावसभाऊ, नवरीसह आदिंवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या आईला प्रथम फोन पे वरून १० हजार तर लग्ना दिवशी १ लाख ९० हजार असे दोन लाख रुपये रोख आणि मुलीच्या अंगावरील ७ ग्रॅम सोन्याचे झुंबर, मनी मंगळसूत्र १३ ग्रॅम असे ऐवज घेऊन नवरी लंपास झाली. आधीच मुली मिळत नसल्याने अनेक मुलांचे लग्नाचं वय निघून जात असताना अशा फसगतीच्या घटना वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. तीन दिवसांपुर्वीच लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा बीड पोलीसांनी भांडाफोड केला. काल पुन्हा हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »