ग्रामीण भागातील विद्यार्थीनींनी बनवली इंग्रजी विषयाची शैक्षणिक माहिती पुस्तिका
केज तालुक्यातील शंकर विद्यालयाचा उपक्रम

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील साळेगाव येथील शंकर विद्यालयातील इयत्ता सातवीच्या मुलींनी इंग्रजी विषयाचे उपक्रमशील शिक्षक प्रताप केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषयाची माहिती पुस्तिका ( मासिक ) बनवले त्याचे आज सोमवारी ( दि. १९ ) मुख्याध्यापक पी.एम. देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
ग्रामीण भागात असलेल्या या शाळेत नेहमीच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावेळी इंग्रजी विषयाचे शिक्षक नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असलेले प्रताप केंद्रे यांच्या संकल्पनेतून इयत्ता ७ च्या विद्यार्थीनींना इंग्रजी विषयाची शैक्षणिक माहिती पुस्तिका ( मासिक ) बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. यासाठी केंद्रे यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार कु. इरम सय्यद,अस्मिता इंगळे, सेजल कचुळे, मयुरी मुळे, रेणुका बुदगुडे यांनी परिश्रम घेऊन उत्कृष्ट अशी माहिती पुस्तिका तयार केली. याचे प्रकाशन शाळेचे मुख्याध्यापक पी.एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थीनींचे कौतुक केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.