खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांच्यावर केज मध्ये गुन्हा दाखल होणार?

केज : सकाळ पासून राज्यात फक्त खासदार व आमदार असलेल्या राणा पती-पत्नीची चर्चा सुरू आहे. मुंबई व अमरावती असे दोन्ही ठिकाणी वातावरण तापलेले आहे. असे असताना केज येथेही राणा पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होणार की, नाही. याकडे केज वासियांचे लक्ष लागले आहे.
नवनीत राणा या खासदार तर पती रवी राणा हे आमदार आहेत. दोन्ही पती-पत्नी संविधानिक पदावर कार्यरत असताना त्यांनी अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत आहेत. असा आरोप करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हनुमंत भोसले यांनी निवेदनाद्वारे केज पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय शंकर वाघमोडे यांना केली आहे. यावेळी भाई मोहन गुंड, गौतम बचुटे हे उपस्थित होते. या निवेदनामुळे आमदार, खासदार आसणाऱ्या राणा दांपत्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न विचारला जात असून त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.