खळबळजनक! अंबाजोगाई तालुक्यात चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार

अंबाजोगाई : रस्त्यावर खेळत असलेल्या अवघ्या ८ वर्षाच्या चिमुकलीला घरात बोलावून २३ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने अंबाजोगाई तालुक्यात खळबळ माजली असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील एक ८ वर्षीय चिमुकली घराबाहेर रस्त्यावर खेळत होती. यावेळी गावातील किरण शेरेकर याने मुलीला घरात बोलावून घेतले व तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ( दि. १९ ) शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे. हा प्रकार चिमुकलीने घरी सांगितल्यानंतर घटनेला वाचा फुटली. पिडीत चिमुकलीच्या चुलत्याने दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर ( वय २३ वर्ष ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना उघडकीस येताच अंबाजोगाई तालुक्यात खळबळ माजली असून, आरोपी विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात