क्रुझर व ट्रकचा सायगाव जवळ भीषण अपघात; ७ जण ठार झाल्याची भीती
मयत सर्वजण लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती; राडी येथे कार्यक्रमाला जाताना काळाची झडप

अंबाजोगाई : तालुक्यातील सायगाव जवळ अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील नंदगोपाल दूध डेअरी जवळ ट्रक व क्रुझर जीपची धडक होऊन भीषण अपघात तासाभरा पुर्वी घडली आहे. या घटनेत तब्बल ७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मयत हे लातूर जिल्ह्यातील असून ते अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे कार्यक्रमाला जाताना काळाने गाठलं आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील काही जण क्रुझर जीपने अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे काहीतरी कार्यक्रमा निमित्त चालले होते. दरम्यान सायगाव जवळील नंदगोपाल दूध डेअरी जवळ ट्रक व क्रुझरची जोरात धडक होऊन अपघात घडला. अपघात इतका भीषण आहे की, क्रुझरचा पुर्ण चुराडा झाला असून, यामध्ये तब्बल सात जणांजा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु अद्याप अधिकृत आकडा समोर आला नाही. यापुर्वीही याच ठिकाणी बस व ट्रकचा अपघात झालेला आहे. त्यामुळे हा अपघातस्थळ बनल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.