बीड जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेच्या गटबाजीचा स्फोट; दोघांची हकालपट्टी
जिल्हाप्रमुखाकडून महिला नेत्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल करुन दिली माहिती

लोकगर्जनान्यूज
बीड : ठाकरे गट शिवसेनेत गुरुवारी ( दि. १८ ) गटबाजीचा स्फोट झाला. जिल्हाप्रमुखाने स्वतः एक व्हिडिओ व्हायरल करून महिला नेत्याला दोन कानाखाली लावल्याची कबुली दिली. तसेच येथे बराच राडा झाला. याची दखल घेऊन पक्षप्रमुखांनी जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांची हकालपट्टी केल्याची बातमी सकाळी धडकली आहे. आतापर्यंत सर्व व्यवस्थित असताना ऐन महाप्रबोधन सभेच्या आगोदरच गटबाजी चव्हाट्यावर आली व परिस्थिती मारहाण पर्यंत गेली. यामगे नेमकं कारणं काय? असा प्रश्ना जिल्ह्यातील जनतेला पडला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महाप्रबोधन सभा शनिवारी ( दि. २० ) बीड येथे आयोजित करण्यात आली. यासाठी अनेक मोठे नेते यासाठी बीड येथे येणार असल्याने जोरदार तयारी सुरू आहे. या सभा स्थळी पाहणीसाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे सह आदी गुरुवारी ( दि. १८ ) आले . यावेळी प्रथम जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यात मारहाणीची घटना घडली. या गटबाजीतून मोठा राडा झाला असून एका वाहनाची तोडफोड करण्यात आली. यानंतर सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचे समोर आले अन् जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या घटनेची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
व्हिडिओ व्हायरल करुन सुषमा अंधारंना मारहाणीचा दावा
प्रथम जिल्हा प्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांच्यात मारहाणीचे वृत्त झळकले होते. यानंतर रात्री उशिरा जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी स्वतः एक व्हिडिओ मधून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या कार्यालयासाठी विविध साहित्याची मागणी करत आहेत. पैसे घेऊन पद वाटप करत असल्याचा आरोप करत याच कारणातून बाचाबाची झाली व मी त्यांच्या कानाखाली दोन चापटा लगावल्याची माहिती खुद अप्पासाहेब जाधव यांनी दिली. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या मागे नेमकं कारण काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
महाप्रबोधन सभेत पुर्वीच गटबाजी चव्हाट्यावर
गटबाजी एका दिवसाची नसून, आतापर्यंत ती चव्हाट्यावर आली नाही. परंतु ऐन महाप्रबोधन सभेच्या तोंडावर उफाळून आली. ती चक्क मारहाण पर्यंत पोचली. या मागे नेमकं कारण काय? म्हणत जिल्हाभर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.