कोळपिंपरी येथे उन्हाळी सुट्टीतील विद्यार्थी बालसंस्कार शिबिर संपन्न

धारूर : श्री.विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी व महात्मा फुले आश्रम शाळा कोळपिंपरी आयोजित कोळपिंपरी येथे लोकसंसद विद्यार्थी सभाग्रहात १ मे पासून सुरू झालेले पंधरा दिवसाचे विद्यार्थी संस्कार शिबिर नाविन्यपूर्ण भव्य दिव्य विविध कार्यक्रमाने संपन्न झाले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अधिकारी ,पदाधिकारी ,लोकप्रतिनिधी, पत्रकार ,शिक्षण प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली.
याप्रसंगी किर्तन प्रवचन भाषण कौशल्य मार्गदर्शन दिनचर्या चे महत्व,विविध खेळ, गायन, वाद्य, संगीत कार्यक्रम मा.ह.भ.प.महेश महाराज सोळंके यांच्या नेतृत्व मार्गद्शनाखाली राबविण्यात आले.
या प्रसंगी ह.भ.प.श्रीकृष्ण चवार महाराज असरडोह,, ह.भ.प.रामचंद्र महाराज आडस, भागवत महाराज आळंदीकर, ह.भ.प.श्री सागर महाराज शिर्के आळंदी, यांचे कीर्तन प्रवचन झाले.
या कार्यक्रमास विशेष सहकार्य
ह.भ.प.आमर महाराज निळकंठ
ह.भ.प.नंदकिशोर महाराज कदम
ह.भ.प.किरण महाराज पांचाळ
ह.भ.प.शाम महाराज लाखे
ह.भ.प.आदित्य महाराज लाखे
यांचे लाभले. सर्वांचे आभार सुरेश यादव यांनी मानले.