केज शहरातही दोन दुकाने फोडली एका ठिकाणी प्रयत्न

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील माळेगाव पाठोपाठ केज शहरातील दोन मेडिकल फोडण्यात आले असून एक दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. सदरील चोरटे एका चारचाकी वाहनातून आले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. ही घटना सकाळी उघडकीस येताच खळबळ माजली असून, चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम चिल्लर साठी ठेवलेली चोरुन नेली आहे.
शहरातील मंगळवार पेठेती व्यंकटेश मेडिकल, तसेच सुरेश चाटे यांच्या मेडिकलचे शटर वाकवून फोडण्यात आले. चोरट्यांनी गल्ल्यात ठेलेल्या चिल्लरवर डल्ला मारला आहे. एक दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. सदरील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून ते चारचाकी वाहनातून आले असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील माळेगाव येथे दोन दुकाने अन् शहरातील दोन दुकाने फोडल्याचे समोर आले असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. आधीच धंदे थंड असून जर चोऱ्या होऊ लागल्यातर कसं होणार? अशी चिंता व्यक्त केली जात आहे.