केज मध्ये ८० टक्के शांततेत मतदान

केज : येथील नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार प्रभागासाठी आज मतदान घेण्यात आले. यासाठी ८०.०४% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रभाग क्रं. १ मध्ये एकूण १४२४ मतदारां पैकी ११६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात ५९५ पुरुष, ५७१ स्त्री आणि एक तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे. तसेच प्रभाग क्रं. दोन मध्ये एकूण १७९३ मतदारां पैकी १४९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात ७९५ पुरुष, ६९८ स्त्री, प्रभाग क्रं. आठ मध्ये एकूण १४७८ पैकी ५८५ पुरूष तर ५५२ स्त्री असे एकूण ११३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रं. बारा मध्ये एकूण १३३३ पैकी १०८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ५६८ पुरुष, ५२० स्त्री मतदारांचा समावेश आहे. चार प्रभागासाठी एकूण ६०३७ एवढे मतदान होते. पैकी ४८३५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून ८०.०४% एवढे विक्रमी मतदान झाले.
शहरातील मतदान केंद्रांना सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी भेटी दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यासह दंगल नियंत्रण पथक यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. तसेच येथील मतदान केंद्रावर कोविड लसीकरण ही ठेवण्यात आले होते.