केज पोलीस आयोजित कराटे प्रशिक्षण शिबीर सुरु स्वसंरक्षणासाठी मुलींसाठी पंधरा दिवस दिले जाणार प्रशिक्षण

केज : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुली सक्षम व्हाव्यात व अडचणीच्या प्रसंगी स्वतः चे संरक्षण करता यावे म्हणून केज पोलीसांकडून पंधरा दिवसांचे कराटे प्रशिक्षण शिबीर आयोजित केलं. आज मंगळवारी सकाळी पोलीस ठाणे परिसरात शुभारंभ करुन सुरवात करण्यात आली. या कराटे प्रशिक्षणास मुलींनी चांगला प्रतिसाद दिला असून आणखी मुलींनी सहभागी लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस प्रशानाने केले आहे.
मुलींच्या छेडछाड व आदी प्रकार वाढले आहेत. या अनुषंगाने नारी अबला नव्हे तर सबला बनविण्यासाठी बीड जिल्हा पोलीस महासंघाच्या आदेशानुसार केज पोलीसांकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत म्हणून कराटे शिबिर आयोजित केले. आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे ग्राउंड वर शुभारंभ करुन प्रत्यक्ष कराटे शिबिरास सुरवात करण्यात आली. यावेळी कराटे प्रशिक्षक अनिल ठोंबरे, बद्रीनाथ तळेकर, बन्सी राऊत यांनी मुलींना कराटेचे धडे दिले. यामध्ये अचानक कोणी हल्ला केला तर त्यास प्रतिउत्तर कसे द्यायचे या टिप्स देण्यात आल्या आहेत. या कराटे शिबिरास मुलींकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पंधरा दिवस कराटे प्रशिक्षण शिबीर सुरु रहाणार आहे त्यामुळे इच्छुक मुलींनी आताही सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. यावेळ सपोनि शंकर वाघमोडे उपस्थित होते.