केज पोलीसांनी छापा मारुन देशी, विदेशी दारू पकडली पोलीसांना दारु, गुटखा सापडतो पण मटक, पत्याचे क्लब का नाही? जनतेचा सवाल

केज : तालुक्यातील कानडीमाळी येथे छापा मारुन केज पोलीसांनी देशी,विदेशी दारू जप्त करत गावठी ( हातभट्टी ) दारुसाठी लागणारे रसायन नष्ट केले. या कारवाईमुळे पोलीसांचे आभार मानले जात आहे. तसेच खुटखा आणि दारुच अवैध धंद्यात मोडते का? मटका, पत्त्यांचे क्लब हे वैध आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना कानडीमाळी येथे एक महिला तिच्या घरात अवैधरित्या देशी विदेशी दारु विकते तर तिची सुन हातभट्टीची दारू विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक नेमले या पथकाने शनिवारी ( दि.२५ ) सकाळी आकराच्या दरम्यान सुवर्णमाला देविदास काळे यांच्या घरावर छापा मारुन घरातून विनापरवाना विकत असलेल्या देशी दारू संत्रा ७० बाटल्या, टॅनंगो पंच ३६ बाटल्या, मॅक्डोल७,ऑफीसर चॉईस ७बाटल्या, रम ६ बाटल्या असा देशी विदेशी ५,८१० रुपयांच्या मालासह सुवर्णमाला काळे या महिलेला ताब्यात घेतले. दुसऱ्या ठिकाणी जिजाबाई सोमनाथ काळे यांच्या घरातून २० लिटर गावठी हातभट्टीचे कँड ताब्यात घेतले तसेच हातभट्टी दारु बनवण्यासाठी तयार केलेले पाचशे लिटर रसायन फेकून देऊन नष्ट केले. दरम्यान जिजाबाई काळे महीला पळून जाण्यात यशस्वी झाली. आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे,फौजदार दादासाहेब सिद्धे,महीला पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे, दिलीप गित्ते यांनी केली. याबाबत केज पोलीसांचे आभार मानले जात आहे. तर, याप्रमाणे मटका, पत्त्यांचे क्लब यावरही कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.