केज नगर पंचायतीच्या विषय समितींच्या सभापतींच्या निवडी घोषित; कोणाची लागली वर्णी?

केज : नगर पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी नंतर आज विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी झाल्या आहेत. सभापती पदी कोणाची वर्णी लागली पहा.
केज नगर पंचायतीच्या निवडणुकीत जनतेने त्रिशंकू कौल दिल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस व जनविकास आघाडी यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीही झाल्या. यानंतर विषय समित्यांच्या निवडी कडे शहर वासियांचे लक्ष लागले होते. प्रत्येकाला सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. ही उत्सुकता ही आज संपली असून सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सौ. कराड आशाबाई सुग्रीव, स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी गुंड सोमनाथ बाळासाहेब, पाणीपुरवठा व जलनिसरण समिती सभापतीपदी अंधारे शकुंतला सज्जन, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी रांजनकर पल्लवी ओमप्रकाश, शिक्षण, क्रिडा व विद्युत समिती सभापतीपदी दांगट शितल पशुपतीनाथ, नियोजन व पर्यावरण विकास समिती सभापतीपदी शेख तस्लिम युनुस यांची वर्णी लागली आहे. या नवनियुक्त सभापतींचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.