केज नगराध्यक्ष अविरोध! घोषणा बाकी

केज : केज नगराध्यक्षपदासाठी केवळ एकच उमेवारी अर्ज आल्याने नगराध्यक्षाची निवड अविरोध झाली. परंतु औपचारिकता म्हणून केधळ घोषणा बाकी आहे. आता उपनगराध्यक्ष निवडीकडे शहराचे लक्ष लागले आहे.
केज नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्याने येथे जनविकास आघाडी ८, राष्ट्रवादी काँग्रेस ५, राष्ट्रीय काँग्रेस ३, अपक्ष १ असे सदस्यांचे संख्याबळ असल्याने कोणालाही स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे जनविकास आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्र येऊन केज नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. आज नगराध्यक्ष पदाचा उमेवारी दाखल करण्याच्या दिवशी जनविकास आघाडीच्या सीता बनसोड यांचा एकमेव अर्ज आला. त्या केज नगरपंचायतीच्या अविरोध नगराध्यक्ष ठरल्या आहेत. परंतु याची औपचारिक घोषणा आणखी बाकी आहे. आता उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.