पाठयपुस्तकांना वाह्यांची पाने नकोत, स्वाध्याय पुस्तिका द्या: महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी

लोकगर्जनान्यूज
बीड : सरकारला कोणतेही नवीन प्रयोग करायचे असले तर सरकारला शिक्षण क्षेत्र सहजपणे मिळते. असाच एक नवीन निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून नव्या प्रकारचे पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्र्याकडून जाहीर करण्यात आले आहे. आता शालेय पाठ्यपुस्तकात वह्यांची कोरी पाने जोडण्याचे नवीन उपक्रम सरकार करून केले जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने शालेय पाठ्यपुस्तकांनाच वयाची पाने जोडण्याचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. प्रत्यक्षात हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी किती व्यवहार्य व लाभदायक आहे याबाबतची मते संकलित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे (बालभारती) यांच्याकडून ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणात विविध प्रश्न विचारण्यात आले आहे. यामध्ये पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानांनी वाह्यांचा वापर थांबेल का? पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानांवरील नोंदी विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील का? पुस्तकात इयत्तानिहाय किती पाने असावीत? कोणत्या विषयासाठी किती पाणी असावीत? अशा प्रकारचे अनेक प्रश्न या सर्वेक्षणात विचारले आहे. ही ऑनलाईन प्रश्नावली भरण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले आहे.परंतु बऱ्याच शिक्षक व शिक्षक संघटनेकडून या निर्णयाचा विरोध होत आहे.
“कोरोना काळा शाळा बंद असल्यामुळे अगोदरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे, पुस्तकात कोरी पाने जोडण्याचे सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि त्रासदायक ठरणार आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे. खरच सरकारला गोरगरिबांच्या मुलांना काही द्यायचे असेल तर मुलांना स्वतंत्र कोरे वह्या आणि स्वाध्याय पुस्तिका द्यावे आणि शाळेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावी” अशी मागणी शेख माजेद अहमद जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना बीड यांनी प्रसिद्धी पत्रकात केली आहे.