केज तालुक्यातील या गावातील दोन दुकाने फोडली; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील माळेगाव येथे मशनरी व मेडिकलचे अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून फोडल्याचे घटना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मशनरीच्या दुकानातून ११ हजार ५०० रु. चोरुन नेले आहे. सदरील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.
गणेश बिभिषण चिरके यांचे गावात गणेश ट्रेडर्स ॲन्ड मशनरी हे दुकान आहे. सोमवारी रात्री ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून गेले. तर नोकर दुकानात झोपलेला होता. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानेचे शटर वाकवून ते आतमध्ये घुसले गल्ल्यातील रोख रक्कम ११ हजार ५०० चोरून नेले. परंतु आवाज आल्याने बाजुला झोपलेल्या नोकराला जाग आली. कशाचा आवाज आला म्हणून तो पहाण्यासाठी आला असता तिघे जण दिसून आले. नोकराने आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले. दुसरी घटना सुर्डि फाट्यावर असलेले ज्ञानेश्वर राजाभाऊ गिरी यांच्या मेडिकलचेही त्याच पध्दतीने शटर वाकवून चोरटे दुकानात घुसले पण तेथे त्यांच्या काहीच हाती लागले नाही. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी डोंगरे आणि गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. एकाच रात्रीत दोन दुकाने फुटल्याची घटना घडल्याने माळेगाव ( ता. केज ) येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.