केज तालुक्यातील या गावात पाणी पेटले!

केज : तालुक्यातील साळेगाव येथील पूर्व भागात नळाला पाणी येत नसल्याने ग्रामपंचायतीला निवेदन देऊन ही दखल न घेतल्याने नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. पाणी पेटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
साळेगाव येथील बस थांबा असलेल्या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. याबाबतीत नागरिकांनी अनेक वेळा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची केली. परंतु ग्रामपंचायतने त्याकडे दुर्लक्ष केले ( दि.३ )फेब्रुवारी ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी निवेदन दिले. त्यामध्ये या भागात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर, ( दि. १३ ) फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा ईशारा दिला होता.
१० दिवसांची वेळ देऊनही ग्रामपंचायत कार्यालयाने काहीच हालचाल न केल्याने अखेर निवेदनाद्वारे दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे आज ( दि.१३ ) पासून साळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बालासाहेब बचुटे, लक्ष्मण लांडगे, सचिन राऊत, बलभीम बचुटे, जय जोगदंड, रत्नाकर राऊत, रामेश्वर शिंदे, सय्यद अझर, अजय बचुटे, अक्षय वरपे, सलामत पठाण, शिवसेनेचे ज्योतिकांत कलसकर यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.