केज तालुक्यातील ‘या’म्हत्वाच्या ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर

लोकगर्जनान्यूज
केज : ग्रामपंचायत निवडणूक २०२३ पार्श्वभूमीवर प्रभाग निहाय आरक्षण सोडतीचा प्रोग्राम जाहीर झाला. आज मंगळवारी ( दि. २० ) विशेष ग्रामसभा बोलावून आडस ( ता. केज ) या तालुक्यात म्हत्वाच्या ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय ५ प्रभागाचे १५ जागेसाठी आरक्षण सोडत पार पडली.
जानेवारी २०२३ ग्रामपंचायत कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील १८६ तर केज तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या हलचाली सुरू झालेल्या दिसत आहे. ( दि. २१ ) पर्यंत प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश आहेत. या अनुषंगाने आज मंगळवारी ( दि. २० ) सकाळी ११ वाजता आडस ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रासभा बोलावण्यात आली. यामध्ये ५ प्रभागाचे प्रत्येकी तीन असे एकूण १५ सदस्यांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक १) मध्ये ना.मा.प्र. स्त्री ( OBC F. ), स.सा.स्त्री ( OPEN F. ,) , स.सा. ( OPEN ), प्रभाग क्रमांक २) ना.मा.प्र. ( OBC ), अ.जा. स्त्री ( SC F. ), स.सा.स्त्री ( OPEN F. ), प्रभाग क्रमांक ३) ना.मा. प्र. ( OBC ), अ.जा.स्त्री ( SC F. ) , स.सा. ( OPEN ), प्रभाग क्रमांक ४) स.सा. ( OPEN ), स.सा.स्त्री ( OPEN F. ), स.सा. स्त्री ( OPEN F. ), प्रभाग क्रमांक ५) अ.जा. ( SC ), ना.मा. प्र. ( OBC F. ), स.सा. ( OPEN ) या प्रमाणे जागा आरक्षित झाल्या आहेत. यावेळी तहसीलदार यांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी तांबारे एस.एस., सहाय्यक एन.के. उगले, तलाठी सी.डी. कांबळे, ग्रामविकास अधिकारी अशोक तोडकर, मा.सरपंच बालासाहेब ढोले, चेअरमन उद्धवराव इंगोले, मा.उपसरपंच ओमकार आकुसकर, मा.ग्रा.पं. सदस्य शिवरुद्र आकुसकर, बाळासाहेब देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आरक्षण सोडत होताच निवडणूक प्रोग्राम कधी जाहीर होणार याकडे इच्छुक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.