केज तालुक्यातील दोन विद्यार्थीनीनी केली ‘ही’ परिक्षा पास दुसरी साठी पात्र,तर मिळणार ५ हजार शिष्यवृत्ती

लोकगर्जनान्यूज
केज : नवी दिल्ली मार्फत घेण्यात आलेली नॅशनल ओलंपियाड स्पर्धा परीक्षा लेवल फस्ट ने तालुक्यातील युसुफ वडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावी विज्ञान वर्गातील दोन विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्या दोघींनी प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळवून दुसऱ्या ( लेवल टू ) साठी पात्र ठरल्या आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या दोघींनाही प्रति वर्ष ५ हजार शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाकडून देण्यात आली.
चोपने सानिका अरुण आणि पौळ राधा संजय असे या दोन्ही उत्तीर्ण विद्यार्थ्यांनींची नावं आहेत. नॅशनल ऑलिंपियाड फाउंडेशन नवी दिल्ली मार्फत त्या दोघींनाही गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. तसेच त्यासोबत आँप्रिसिएशन प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले. या दोघीही नॅशनल सायन्स ओलंपियाडच्या पुढील इंटरनॅशनल लेवल टू साठी पात्र ठरल्या आहेत. ही लेवल टू परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सदरील फाऊंडेशन कडून या दोघींनाही वर्षाला प्रत्येकी ५ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रथम परीक्षा यशस्वी सर केल्याबद्दल व पुढील परीक्षेतही यशस्वी व्हावे म्हणून संस्थेचे सचिव दीपक घुमरे,प्राचार्य भोसले.ए. यु., पर्यवेक्षक मस्के.ए.एस.,तसेच चव्हाण एन.एन, गडकर.एम.एम., श्रीमती शितोळे.ए.बी., मुळे.व्ही.आर,चव्हाण डी.ए , राठोड.एस .जी, वाणी एस.पी. यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.