केज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणी ‘या’ प्रमाणे होणार

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या भावी कारभाऱ्यांचे भवितव्य रविवारी मत पेटीत बंद झाले. उद्या मंगळवारी ( दि. २० ) मतमोजणी होणार असून, याची तयारी पुर्ण झाली आहे. वेळ जवळ येत आहे तशी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मतमोजणी तहसील कार्यालयाच्या पाठी मागील इमारतीत होणार आहे. मत मोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होतील. यामुळे १ ते ४ या फेरीत १४ टेबलावर १४ ग्रामपंचायतीच्या मतांची मोजणी होईल तर, शेवटच्या ५ व्या फेरीत ८ टेबलावर ८ ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. सकाळी ९ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींना पास पाहून आतमध्ये सोडण्यात येईल. विना पास कोणालाही सोडण्यात येणार नाही. प्रत्यक्षात १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल अशी माहिती तहसीलदार दुल्हाजी मेंडके यांनी दिली आहे. यासाठी सर्व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ६४ ग्रामपंचायतीचे निकाल हाती येतील असा अंदाज आहे. मतमोजणी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळी १५० कर्मचारी व ९ अधिकारी बंदोबस्तात राहणार आहेत.