सारणी मध्ये नामदेव महाराज चरित्र व भव्य सप्ताहाला सुरुवात
कीर्तन व कथेचा लाभ घेण्याचे गावकऱ्यांचे अवाहन

केज : दरवर्षी प्रमाणे व प्रथे परंपरेप्रमाणे याही वर्षी सारणी (आ) येथे जागृत देवस्थान हनुमानजी च्या जयंतीनिमित्त दि.३० पासून अखंड हरिनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून दि.३१ पासून संत नामदेव महाराज यांचे चरित्र कथा दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत प्रसिद्ध कथा वक्ते ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे हे सांगणार आहेत तसेच नामवंत कीर्तन करांचे कीर्तन देखील दररोज होणार असून या महोत्सवात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी हजर रहावे व कीर्तन आणि कथेचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त सारणी (आ) ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या सारणी (आ) येथील हनुमान जयंतीनिमित्त संत नामदेव महाराज यांचे चरित्र व दररोज संध्याकाळी नामवंत महाराजांचे कीर्तन होणार आहेत. गुरुवर्य ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदरशनाखाली होत असलेल्या या सप्ताहात दि.३० रोजी संध्याकाळी हभप प्रकाश महाराज साठे, दि.३१ रोजी हभप दादा महाराज रंजाळे, दि.१ एप्रिल रोजी हभप आण्णासाहेब महाराज बोधले, दि.२ रोजी हभप शंकर महाराज शेवाळे, दि.३ रोजी हभप महादेव महाराज राऊत, दि.४ रोजी नामवंत कीर्तनकार, हभप बाळू महाराज गिरगावकर, दि.५ हभप रामायणाचार्य पांडुरंग महाराज शितोळे (आळंदी), दि.६ एप्रिल रोजी हभप मधुकर महाराज सायाळ यांचे रात्री दररोज ९ ते ११ या वेळेत कीर्तन होईल.
बारावी, ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी:अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
तर दि.५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता प्रख्यात हभप जमदग्नी महाराज परळी वै. व हभप फड सर परभणी यांचा भारुड जुगलबंदी कार्यक्रम होणार आहे. दि.६ एप्रिल रोजी दुपारी १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल व दि.७ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त भजनी मंडळ, युवक मंडळ, गावकरी मंडळ सारणी (आ) यांच्या वतीने करण्यात येत आहे.