आपला जिल्हाक्राईम

केज जवळील थरारक घटना! चालत्या कारला लागली आग

लोकगर्जनान्यूज

केज : चालत्या कारला आग लागून यामध्ये कार भस्मसात झाल्याची थरारक घटना सोमवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास केज-कळंब रोडवर शहरापासून जवळच असलेल्या पोतदार स्कूल जवळ घडली आहे. आग लागल्याचा प्रकार चालकाच्या लक्षात येताच कार रस्त्याच्या बाजूला घेऊन आतील सर्वजण बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

राजेश घुले रा.टाकळी (ता.केज) हे सोमवारी पुणे येथून आपल्या गावी टाकळी येथे परत येत होते. दरम्यान ते केज शहराजवळ पोतदार इंग्लिश स्कूल जवळ आले असता त्यांना कारमधून धुर निघत असल्याचे अन् काहीतरी जळत असल्याचा लक्षात आले. कसलीही वेळ न घालवता घुले यांनी त्यांच्या ताब्यातील कार रस्त्याच्या कडेला घेऊन उभी केली. आतून बाहेर पडले. बाहेर येताच कारने अचानक पेट घेतला अन् पहाता-पहात कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.घुले यांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. कार जळत असल्याने काहीकाळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती तसेच बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »