केज-कळंब रस्त्यावर दुचाकी चुकविताना ट्रक पलटी

लोकगर्जनान्यूज
केज : सरकी घेऊन चाललेला ट्रक माळेगाव ( ता. केज ) जवळ आला असता वळणावर दुचाकीला वाचविताना पलटी झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये ट्रक चालक जखमी झाला आहे.
माजलगाव येथून सरकी पेंड घेऊन सांगली कडे जाणार एमएच ११ एम ६१११) सहा चाकी मालवाहू टाटा ट्रक खामगाव पंढरपूर महामार्गावर केज तालुक्यातील माळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वळणावर चुकीच्या दिशेने आलेल्या एका दुचाकीला चुकविताना ट्रक चालकांचे नियंत्रण सुटल्याने जळवच्या खड्यात जाऊन पलटी झाला. ही घटना मंगळवारी ( दि. २५ ) रात्री दहा वाजता घडली.यात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अपघातात चालक संतोष भारत राठोड (मोहखेड ता धरूर वय २८)यांच्या नाकाला दुखापत झाली आहे.
वळण बनले धोकादायक;गतिरोधक बसवण्याची मागणी
खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय (महामार्ग क्र५४८ सी) मार्गावर माळेगाव (ता केज) येथील चौकात रस्ता बनवत असताना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती घाबरदारी न घेतल्यामुळे यूटर्न आकाराचा रस्ता झाला आहे.
केजहुन येणाऱ्या वाहनधारकांना येथील वळणाचा रात्रीच्या वेळी अंदाज येत नाही वेगात येणारी वाहने येथे पलटी होऊन खड्यात जाऊन नेहमी अपघात घडत आहेत.याशिवाय चौकाजळ राहणाऱ्या नागरिकांचा देखील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून माळेगाव चौकात वाहनधारक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात व गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.