शुभम खाडे यांना पत्रकारितेचा त्र्यंबक आसारडोहकर पुरस्कार जाहीर

लोकगर्जनान्यूज
आंबाजोगाई : कै त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानचा १० वा बीड जिल्ह्यातील मानाचा पत्रकारिता पुरस्कार यंदा दैनिक कार्यारंभ चे उपसंपादक शुभम खाडे यांना जाहीर करण्यात आला.
शुभम खाडे हे युवा पत्रकार असून ते होळ (ता केज) या ग्रामीण भागातून आले आहेत. कमी वयात त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठा नावलौकिक संपादन केला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून कै त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता हा मानाचा पुरस्कार दिला जातो. कोवीड काळानंतर हे सातत्य ठेवत या वर्षाचा पुरस्कार शुभम खाडे यांना जाहीर केला. प्रतिष्ठानच्या बैठकीत सर्वानुमते हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. असे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण आसरडोहकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. डिसेंबर महिन्यात एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुर्वी सय्यद दाऊद (आडस), अभिजित गाठाळ (अंबाजोगाई), दत्ता देशमुख (विडा),अतुल कुलकर्णी (बीड), गोविंद शेळके (घाटनांदूर), कलीम अजीम (पुणे), श्रावण कुमार जाधव केज, संदिप सोनवलकर (मुंबई), आणि विद्या गावंडे (औरंगाबाद), या ९ जनांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
यंदाच्या पुरस्कारासाठी शुभम खाडे यांची निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी खाडे यांचे अभिनंदन केले.