कृषीप्रादेशिक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिक्विंटल मदतीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

लोकगर्जनान्यूज

मुंबई : शेतकऱ्यांसाठी म्हत्वाच पीक म्हणून कांद्याकडे पाहिलं जातं. परंतु मागील काही दिवसांपासून याचे पडलेले दर चिंतेचा विषय ठरला आहे. हा मुद्दाही अर्थसंकल्प अधिवेशनात गाजला आहे. आजही विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर याविषयी घोषणाबाजी केली. अखेर सरकारने मागे सरकत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत प्रतिक्विंटल ३०० रु. इतकी सानुग्रह अनुदानाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सोयाबीन,कापसाचे दर पडलेले असल्याने आधींच शेतकरी अडचणीत आहेत. त्यात पुन्हा कांद्याने रडवले असून, अनेक क्विंटल कांदा विकून शेतकऱ्यांच्या हाती १,२ रुपये शिल्लक राहिल्याचे मागे वृत्त होते. यामुळे काही शेतकऱ्यांनी तर कांदा विक्री करण्याऐवजी फेकून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. बाजारही कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून, बीड तालुक्यातील एका शेतकऱ्याने कांद्याचे भाव पडल्याने मृत्यूला कवटाळले आहे. हे प्रकार वाढू नये म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात येत आहे. हा मुद्दा विरोधकांनी अर्थसंकल्प अधिवेशनात चांगलाच उचलून धरला होता. परंतु शासनाकडून काही दिलासादायक निर्णय झाला नाही. आजही विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सकाळी येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिक्विंटल ३०० रु. सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. हे सरकार शेतकऱ्यांसाठी असल्याचे सांगून मागील काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन २०१६ मध्ये १००, २०१७ मध्ये २०० रू अनुदान दिले होते याची आठवण करून देत. हे सरकार शेतकऱ्यांचे असल्याने थेट ३०० रु. अनुदान देत असल्याचे म्हणाले. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »