आपला जिल्हाकृषी

कहर! आजही लंपी स्कीनने घेतला गायीचा बळी; सहायक आयुक्तांची आडस येथे भेट

शेतकऱ्यांनो घाबरु नका नियमांचे पालन करा २०७ पैकी २९० जनावरे तंदुरुस्त झाली

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील आडस येथे लंपी स्कीन संसर्गाचा कहर झाल्याचे दिसून येत असून शनिवारीच एका गायीचा लंपी मुळे मृत्यू झाला. एकच दिवस मधी गेला की, सोमवारी ( दि. ५ ) एक गाय दगावली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, वाढता संसर्ग पहाता पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त यांनी आडस येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना घाबरून न जाता काळजी घेण्याची व नियमाप्रमाणे जनावरांना उपचार घेण्याचे आवाहन केले. तसेच २०७ बाधित जनावरां पैकी १९० दुरूस्त झाले तर सध्या ८ जनावरे उपचाराखाली असल्याची माहिती दिली.

लंपी स्कीन या जनावरांच्या आजाराने मागील अडीच महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेकडो जनावरे दगावली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आधीच अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी अर्धमेला झाला त्यात पुन्हा या लंपीच्या संकटाने पुर्णपणे हादरुन गेला आहे. आडस ( ता. केज ) येथे लंपी स्कीनने कहरच केल्याचं दिसून येत असून, शुक्रवारी आण्णासाहेब अश्रुबा चव्हाण यांचा वासरु, शनिवारी ओमकांत मेनकुदळे यांची गाय यापुर्वीही एक अशा दोन गायी तर सोमवारी ( दि. ५ ) महारुद्र धर्मराज आकुसकर यांची गाय दगावली आहे. चार दिवसात तीन जनावरे दगावली असल्याने शेतकरी हादरुन गेला आहे. आतापर्यंत आडस येथे ५ जनावरे लंपीने दगावली आहेत. एकूण २०७ जनावरे बाधित आढळून आली. त्यातील १९० जनावरे पुर्णपणे दुरुस्त झाली असून सध्या ८ जनावरे उपचाराखाली आहेत. पाच जनावरे दुर्दैवाने दगावली आहेत. १०० टक्के लसीकरण होऊनही जनावरे दगावत असल्याने अधिक चिंता वाढली आहे. आजही गाय दगावल्याची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे बीड येथील सहायक आयुक्त डॉ. दत्तात्रय देवकते, केज विस्तार अधिकारी डॉ. एस.पी. थळकरी, आडस पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. दत्ता मसने यांनी भेट देऊन पंचनामा केला. या तिघांनीही या शिवारातील प्रत्येक गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच घाबरून न जाता पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, अधिकारी ज्या सूचना करत आहेत त्यांचे काटेकोर पालन करावे, आपण नक्कीच या संकटाला परतवून लावू असा विश्वास व्यक्त केला.
मंगळवारी लंपी बाबतीत मार्गदर्शन मेळावा
वाढता लंपी स्कीनचा संसर्ग पहाता आडस येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे पशु पालन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला तज्ञ मार्गदर्शक येणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. दत्ता मसने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »