बीड जिल्हा हादरला!वाळू उपसा केलेल्या खड्ड्यात बुडून चार बालकांघा मृत्यू; ग्रामस्थ आक्रमक

गेवराई : तालुक्यातील वाळू उपसा सर्व परिचित झाला आहे. परंतु आता हे लोकांच्या जिवावर उठल्याचे दिसत आहे. वाळू उपसा केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काही वेळा पुर्वी उघडकीस आली. या घटनेने बीड जिल्हा हादरला असून, ग्रामस्थांनी कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला असून शहाजानपूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेवराई तालुक्यातील सिंदफना नदीतून माफिया वाळूचा बेसुमार उपसा करत आहेत ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. याला प्रशासनाचे कातडी बचाव धोरण कारणीभूत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. हा गोरखधंदा पैसे कमवण्यापुरता होता, तोपर्यंत ठिक. पण हा धंदा आपा लोकांच्या जिवावर उठल्याचे दिसत आहे. मागे काही दिवसांपूर्वी एका मानसाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले होते यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी हे प्रकरण जिल्ह्यात खुप गाजलं आहे. आजतर झोप उडवणारी घटना उघडकीस आली असून, गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथील बबलु गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे, अमोल संजय कोळेकर या बालकांचा वाळू उत्खननामुळे झालेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन या बाबतीत काही पावलं उचलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.