ऐक्याचा संदेश; हरीनाम सप्ताहात इफ्तार अन् ईदला मस्जिद मध्ये शिरखुर्मा

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : तालुक्यातील पाटोदा येथे रमजान महिन्यात अखंड हरीनाम सप्ताहात मुस्लिम बांधवाना इफ्तारची पंगत देऊन सामाजिक ऐक्या चे उदाहरण गावाकऱ्यांनी दिले होते तर, मुस्लिम बांधवानी रमजान ईदच्या दिवशी सर्व गावाकऱ्यांना मस्जिद मध्ये बोलावून शीरखुर्मा चे कार्यक्रम आयोजित करून गावाकऱ्या सोबत ईद साजरी करून सामाजिक ऐक्य कायम राहील असा आदर्श निर्माण केला.
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे मागील दोन वर्षांपासून एकमेकांबद्दल सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने केले जात. राजकीय स्वार्थासाठी राजकीय व्यक्ती समाजात आपसात गैरसमज निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेतात याला सर्वसामान्य जनता बळी पडत नाही असे उदाहरणं बरीच आहेत. त्यातीलच पाटोदा येथे दोन्ही समाजाकडून आपसात सदभावना आणि बंधुप्रेम असेच कायम राहावे अशी प्रार्थना ईद च्या निमित्त करण्यात आली. यासाठी रमजान महिन्यात अखंड हरिनाम सप्ताहात रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली. याचेच अनुकरण करत रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी मस्जिद मध्ये ईद मिलाफ कार्यक्रमाचे आयोजन करुन गावातील सर्व जातीधर्माच्या बांधवांसाठी शिरखुर्मा व गुलगुलेची मेजवानी देत एकतेची पंगत मांडली. या दोन्ही राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
गावातील गावकरी आम्ही सर्व एकमेकांचे बांधव आहेत या भावनेने वागतोत त्यामुळे सामाजिक ऐक्य दूषित करणाऱ्या गोष्टींना गावकरी थारा देत नाहीत. विधायक कामासाठी गावकरी नेहमी तत्पर असतात त्यामुळे स्वतंत्र पूर्व काळापासून गावाचे ऐक्य कायम आहे व राहील असे गावकरी ईद च्या शुभेच्छा देताना भावना व्यक्त करीत आहेत.
अविनाश उगले (सरपंच पाटोदा )
आम्ही सर्व गावकरी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी असतो ईद निमित्त गावकरी आणि मुस्लिम बांधवानी एकत्र येत ईद साजरी केली असाच प्रत्येक सण उत्सव आम्ही सर्व गावकरी साजरा करतो.
हारून पठाण