ऐकावं ते नवलच! बिबट्या समोर कुत्रा ठरला भारी

जीव वाचविण्यासाठी बिबट्याने ठोकली धूम व्हायरल व्हिडिओतून अजब घटना समोर
लोकगर्जना न्यूज
एका कुत्र्याने चक्क बिबट्याला आपल्या जबड्यात पकडून ठेवलं अन् बिबट्या आपलं जीव वाचविण्यासाठी निपचीत पडलाय. कुत्र्याची पकड काहीशी सैल होताचा कशीबशी सुटका करून घेत बिबट्या धुम ठोकतो. असा एक अजब व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना आंबेगाव तालुका ( पुणे ) येथील असल्याचा दावा करण्यात येत आहे. एका मराठी वाहिनीने सदरील व्हिडिओ सह बातमी प्रसारित केली.
कधी कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. आपण अनेकदा पाहिले आहे अथवा ऐकून आहोत की, बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली. पण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात लांडेवाडी येथे एक अजबच घटना समोर आलीय. एक कुत्रा चक्क बिबट्याला भारी ठरला. कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून घेत जीव वाचविण्यासाठी चक्क पळून गेला. ही घटना लांडेवाडी येथील
गणेश शेवाळे यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. हा कुत्रा ही त्यांचाच असून त्याचं नाव वाघ्या आहे असा दावा त्यांनी केला आहे. ही घटना काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून हा वाघ्यावरील हल्याचा बिबट्याचा दुसरा प्रयत्न असून पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला होता. तेव्हा ही वाघ्यानं आपला बचाव केला. नावा प्रमाणेच वाघ्यानं वागत चक्क बिबट्याला जीव वाचविण्यासाठी पळून जाण्यास भाग पाडले.