क्राईम

बीड जिल्ह्यातील व्यसायिकाचे अपहरण …. पुढे घडला धक्कादायक प्रकार!

 

बीड : चार ते पाच जणांनी जिल्ह्यातील एका व्यसायिकाचे अपहरण केले. सुटकेसाठी मोठी रक्कम मागितली परंतु रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली असता अपहरण कर्त्यांनी बेदम मारहाण करुन दाबणाने टोचून जखमा करत त्रास दिला. यानंतर चालत्या वाहनातून फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

कैलास शिंगटे रा.मादळमोही ता. गेवराई अपहरण झालेल्या व्यसायिकाचे नाव आहे. ते बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून येत असताना पाठीमागून आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. धडक बसताच ते खाली पडले. धडक दिलेल्या वाहनातून काहीजण खाली उतरुन जबरदस्तीने वाहनात कोंबले हा थरार साठेवाडी फाटा येथे घडला. यानंतर कैलास शिंगटे यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून ओरडू नये म्हणून तोंडात बोळा कोंबला. जबर मारहाण केली. तसेच २ कोटी रु. मागणी केली. इतकी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली असता अपहरणकर्त्यांनी दाबणाने टोचून शरिरावर जखमा केल्या. अपहरण करून वाहन औरंगाबादच्या दिशेने जाताना वडीगोद्री जवळ सदरील वाहन बंद पडले. ते चालू होतं नसल्याने ते वाहन कालव्यात ढकलून दिले. दुसऱ्या वाहनाने अपहरणकर्ते पुढे निघाले. वाहन कालव्यात पाहून अपघात झाला म्हणून मोठी गर्दी पाट जवळ झाली. वाहनात आणि आजुबाजुला कोणीही नसल्याने गर्दीतील कोणीतरी घटनेची गोंदी पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. पाहणी करताना पाटा जवळ कैलास शिंगटे यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड सह आदि काही कागदपत्रे सापडली. त्यावरून पोलीसांनी शिंगटे यांच्या नातेवाईकांना संपर्क केला. तेही इकडे चिंतेत होते. नातेवाईकांना पोलीसांचा फोन जाताच त्यांनी कैलास यांची दुचाकी साठेवाडी फाटा येथे पडलेली असल्याची माहिती दिली. दुचाकी तिथे तर कागदपत्रे इथे कशी? याने सर्वच चक्रावून गेले. कदाचित कैलास व अपहरणकर्त्यांची धरपकड झाली असावी व त्यामध्ये ही कागदपत्रे येथे पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु काही वेळाने कैलास यांचाच त्यांच्या वडीलांना फोन आला. त्यांनी मी वडीगोद्री जवळ एका हॉटेलमध्ये असून माझे अपहरण करुन मला फेकून दिले म्हणत पुर्ण हकिकत सांगितली. कैलासच्या वडीलांनी लगेच ही माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी हॉटेल कडे धाव घेतली. कैलास याचा जबाब नोंदवला असता वरील हकीगत सांगितली. हे प्रकरण चकलंबा पोलीसांकडे हस्तांतरीत केले. परंतु अपहरण झाले तर फेकून का दिलं? पैसा नातेवाईकांना सांगण्याऐवजी कैलास यांनाच कसा मागितला? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून हा नेमका अपहरणाचा प्रकार आहे की, आणखी काही? हे आता पोलीस तपास निष्पन्न होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »