फुले लागत असलेल्या सोयाबीन साठी कोणती फवारणी करावी?

लोकगर्जना न्यूज
सोयाबीन पिकाला फुले लागण्यास सुरुवात झाली. या अवस्थेत कोणती फवारणी करावी याबाबत आडस येथील कृषी पर्यवेक्षक रविकांत ठोंबरे यांनी लोकगर्जना न्यूजशी बोलताना म्हत्वाची माहिती दिली आहे.
कापसावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे उत्पादन घटले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च निघणं मुश्किल झाले. कापसाला पर्याय म्हणून मागील वर्षांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली. गतवर्षी व यंदा मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढल्याने सोयाबीन खरीप हंगामातील प्रमुख पीक ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पुर्ण मदार सोयाबीन या पिकावर आहे. सध्या सोयाबीन पीक चांगले बहरले असून, फुलं लागण्यास सुरुवात झाली आहे. हा काळा यासाठी खूप महत्वाचा आहे. यानंतर शेंगा लागणार आहेत. त्यामुळे याकाळात पिकावर रस शोषून घेणारे किडे, अळिंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगले रिझल्ट देणारे परिणाम कारक बुरशीनाशक व किटकनाशकाची फवारणी करावी अशी माहिती आडस कृषी मंडळ अधिकारी कार्यालयाचे पर्यवेक्षक रविकांत ठोंबरे यांनी लोकगर्जना न्यूजशी बोलताना माहिती दिली.
सोयाबीन पिकाची कापसा सारखी अवस्था होऊ नये म्हणून काळजी घ्यावी
नियमित त्याच ठिकाणी प्रत्येक वर्षी कापूस लागवड व फरतड घेतल्याने विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे कापूस आज फक्त नावा पुर्ता उरला आहे. अशी अवस्था सोयाबीन या आपल्या हाती आलेल्या पिकाची होऊ द्यायची नसेल तर पिकांची फेर पालट खूप आवश्यक आहे. तसेच खरिपात सोयाबीन घेतलं त्याचं ठिकाणी उन्हाळी सोयाबीन घेऊन नये. खरिपा नंतर उन्हाळी सोयाबीन त्याच ठिकाणी घेतल्यामुळे येलो मोझॅकचा प्रादुर्भाव आला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आडस परिसराला याचा फटका यावेळी बसला नाही. तुरळक ठिकाणी हा प्रादुर्भाव दिसून आला त्यामुळे गोष्ट कानावरून गेली असं म्हणता येईल.या रोगांना रोखायचे असेलतर शेतकऱ्यांनी त्याच त्या ठिकाणी एकच दुबार पीक घेण्याचे टाळून पीक पालट करावी असे आवाहन कृषी पर्यवेक्षक रविकांत ठोंबरे यांनी केले.