आपला जिल्हा

ऊसतोड मजुरांच्या वाहनाला अपघात दोन ठार, सात जखमी

 

परळी : घराकडे परतत असलेल्या ऊसतोड मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू तर सातजण जखमी झाल्याची घटना सोमवारी ( दि. २० ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सर्फराजपूर ( ता. परळी ) येथे घडली.जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोयाळ (ता. धारुर ) येथील ऊसतोड मजुर सोमवारी रात्री जीपमध्ये गावाकडे परतत होते. दरम्यान परळी तालुक्यातील सर्फराजपूर जवळ चालकाचा ताबा सुटल्याने जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात विशाल गौतम वाव्हळे ( वय १८ वर्ष ) आणि वैजनाथ रामा वाव्हळे ( वय ६५ वर्ष ) या दोघांचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये अरुण नामदेव गायकवाड ( वय ५५ वर्ष ) , शोभाबाई गायकवाड ( वय ५० वर्ष ) रा.तळेगाव, अनिता संजय डोंगरे ( वय ४० धर्ष ) , संजय दासू डोंगरे ( वय ४५ ) रा . हिंगणी, बाळासाहेब कोंडीबा मुंडे ( वय ६५ वर्ष ) , विश्वनाथ बालाजी वाव्हळे ( वय ५० वर्ष ) , रमेश भगवान वाव्हळे ( वय ४० ) रा . कोयाळ यांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »