आमदार मुंदडा व कुटुंबाची बदनामी;एका संपादक व वार्ताहरावर एनसीआर दाखल

लोकगर्जनान्यूज
केज : आमदार सौ.नमिता मुंदडा व त्यांच्या कुटुंबावर बातमीचा माध्यमातून बिनबुडाचे आरोप करत दि. २९ जून ते ४ जुलै अशी बदनामी केली. यामुळे समाज मनात प्रतिमा मलीन केली म्हणत एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून संबंधित संपादक व केज येथील वार्ताहर या दोघांवर केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा ( NCR ) दाखल करण्यात आला.
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या सुनील घोळवे या कार्यकर्त्यांने बीड येथील दैनिक पुण्यभूमी मध्ये दि. २९ जून ते ४ जुलै या काळात आमदार मुंदडा, पती अक्षय मुंदडा, सासरे नंदकिशोर मुंदडा यांच्या विरोधात बातम्या लावून सासरे कारभार हकतात, पती गुत्तेदार सांभाळतो, आमदार मुंदडा सासूचा वारसा चालविण्यात सपशेल फेल, केज, अंबाजोगाईची जनता वाऱ्यावर सोडल्याच्या बातम्या प्रसिद्ध करत तसेच एकेरी उल्लेख केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे आमदार मुंदडा व त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली. यामुळे जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलीन झाल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून पुण्यभूमीचे संपादक बाळासाहेब मस्के, केज येथील वार्ताहर रोहन गलांडे यांच्या विरोधात अदखलपात्र ( NCR ) दाखल करण्यात आला.