आमदार मुंदडांनी केली विधानसभेत मतदारसंघासाठी महत्त्वाची मागणी

लोकगर्जना न्यूज
केज मतदारसंघातील मंजूर रस्ते रद्द करण्यात आलेली आहेत. त्या रस्त्यांना पुन्हा मंजुरी देण्यात यावी तसेच आडस, विडा, बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करावे हे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत उपस्थित केले.
केज मतदारसंघातील २४ रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर झाले होते. परंतु सत्तांतर होताच बीड जिल्ह्यातील ८२ रस्ते रद्द करण्यात आले. त्यातील २४ रस्ते हे केज मतदारसंघातील आहेत. या रस्त्यांची कामं न झाल्याने मोठ्या प्रमाणात खराब झाली असून गुडघ्याबरोबर खड्डे पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना वाहने सोडा पायीं चालणेही मुश्किल झाले आहे. रस्ते विकासाची धामणी मानली जाते त्यामुळे हे रस्ते होणं आवश्यक आहे. शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करुन या रस्त्यांना पुन्हा मंजुरी द्यावी तसेच केज तालुक्यातील आडस, विडा, बनसारोळा ही लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी गावे आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा देण्यास सक्षम दिसतं नाही. इतर ही आदि गांवाच्या आरोग्याची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जबाबदारी आहे. त्यामुळे सध्याचे आरोग्य केंद्राचे मनुष्यबळ कमी पडत आहे. सामान्य माणसाला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी वरील तीन्ही ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणं गरजेचं आहे. हे जनतेच्या जिव्हाळ्याचे व जनतेच्या मानातील प्रश्न चालू हिवाळी अधिवेशनात आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थित केले. त्यामुळे केज मतदारसंघातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.