आनंदगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण कार्यक्रम
डॉ हनुमंत सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

केज : भाऊसाहेब पाटील बी एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हनुमंत सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रोपटे,सन्मानपत्र देऊन करण्यात आला. जि प शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक दशरथ गायकवाड, प्रमुख पाहुणे युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पी एस आय एस बी औटे, सरपंच गणेश राऊत उपसरपंच,अशोक भोगजकर,चेअरमन संजय गायकवाड,संयोजन समिती डॉ अनिल गायकवाड ,श्रीधर गायकवाड यांच्यासह माजी सरपंच उपसरपंच, ग्रा प सदस्य, ग्रामस्थ पालक उपस्थित होते.
पत्रकार,ग्रा प सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,जलसंधारण ,स्वच्छता अभियान चळवळीतील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत,वृक्षारोपण आदी उपक्रम घेण्यात आले.आनंदगाव,युसूफवडगाव,बनसारोळा, पाथरा ,केज येथे वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थित होते
पाचवी ,दहावी,बारावी चे गुणवंत विद्यार्थी अमर गायकवाड, विनोद गायकवाड प्रांजली गायकवाड प्रतीक गायकवाड आदित्य गायकवाड साक्षी घोगले राजनंदिनी गायकवाड ऋतुजा निकम सिद्धी गायकवाड गायत्री गायकवाड अनंतेश्वर गायकवाड अविष्कार गायकवाड ओंकार गायकवाड अर्जुन गायकवाड ऋतुजा शिंपले तसेच शिवानी वैरागे आदींचा सन्मान पत्र ,रोपटे देऊन गौरविण्यात आले.
आम्ही पती-पत्नी मरणोत्तर देहदान केले आहे. समाजसेवा हाच वसा घेऊन कायम सेवा करत राहू.हागणदारी मुक्त गाव,स्वच्छता अभियान जलसंधारण चळवळ,स्मशानभूमी स्वच्छता मोहीम,गरजूंना मदत आदी कामात कायम सक्रिय होऊ सेवा करू
डॉ हनुमंत सौदागर