भवताली
आनंदगाव येथे उद्या आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

केज : तालुक्यातील आनंदगाव आदर्श सरपंच, पाटोदा गावचे शिल्पकार भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान उद्या (दि. ११) गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आले आहे. ग्राम सुधारण्याचा मूलमंत्र घेण्यासाठी नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.
आनंदगाव नेहमीच चळवळीच्या रूपाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून अग्रेसर राहिलेले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चे निमित्त ठेवून युवकांमध्ये जनजागृती व्हावी आदर्श गाव निर्मिती साठी मार्गदर्शन मिळावे म्हणून पेरे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले. परिसरातील सरपंच उपसरपंच नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.