आता शिक्षकांचीही परिक्षा: प्रत्येकजण आपल्या विषयात पारंगत व्हावे म्हणून उपक्रम

लोकगर्जनान्यूज
बीड : विद्यार्थ्यांच्या शंकांचे शिक्षकांना निरसन करता यावं, त्यासाठी शिक्षकही आपल्या विषयात पारंगत असणं आवश्यक आहे. यासाठी औरंगाबाद विभागातील सर्वच शिक्षकांची परिक्षा घेण्यात येणार आहे. असा निर्णय विभागीय आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला.
कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा म्हणावा असा फायदा दिसून आला नाही. यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. ही बाब मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात झालेल्या सर्वेतून समोर आले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांच्या शंकांचे योग्य निरसन व्हावे त्यासाठी शिक्षकही पारंगत असणं आवश्यक आहे. शिक्षकांनाही आपली कमतरता लक्षात यावी यासाठी शिक्षकांच्या परिक्षा घेण्यात येणार आहेत. काळानुसार प्रत्येकजण अपडेट असणं आवश्यक असून शिक्षक तरी मागे का रहावं? तसेच विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांची ही परिक्षा असेल. यासाठी ऑब्जेक्टिव्ह पद्धत असेल. या परिक्षेचा स्तर शक्यतो कठिण असेल, यामध्ये निगेटिव्ह मार्क पद्धत असेल. या परिक्षा औरंगाबाद विभागातील सर्वच जिल्ह्यातील जिल्हा परिषद, संस्थेच्या शिक्षकांच्या परिक्षा असतील अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक मराठी वाहिनीशी बोलताना दिली आहे. तसेच ही प्रत्येक शिक्षकासाठी बंधनकारक नसणार आहे परंतु यात जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे जेणेकरून आपण बदलत्या काळानुसार अपडेट रहाण्यासाठी मदत होईल. शैक्षणिक दर्जा सुधारेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.