आडस येथे दुचाकीची चोरी

लोकगर्जनान्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथील अंबाजोगाई रस्त्यावरील घरा समोर लावलेली दुचाकी शुक्रवारी ( दि. १३ ) रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. मागील काही दिवसांपासून आडस येथे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आडस येथील नारायण उंबरदंड यांचे अंबाजोगाई रस्त्यावर घर आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी शुक्रवारी ( दि. १३ ) रात्री दुचाकी पॅशन प्रो क्रमांक MH 24 AJ 9745 व्हरांड्यात लावली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री सदरील दुचाकी चोरून नेली आहे. सकाळी उठल्यानंतर दारासमोर दुचाकी न दिल्याने शोधाशोध सुरू केले. पण ती कुठेही मिळून आली नाही. ती चोरी झाल्याचे लक्षात आले. यापुर्वीही शेतातील अनेक गोठ्यांवर शेळ्या, कोंबड्या व आदी साहित्य चोरुन नेलेच्या तीन घटना घडलेल्या आहेत. सतत चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.