खळबळजनक! बीड जिल्ह्यातील सात जणांचे मृतदेह पुणे जिल्ह्यातील भीमा नदीत आढळे
मुलाने महिलेला पळवून नेल्याने पुर्ण कुटुंबाने आयुष्य संपवलं!

लोकगर्जनान्यूज
बीड : राज्याला हादरवून टाकणारी घटना आज मंगळवारी ( दि. २४ ) उघडकीस आली असून, मुलाने महिलेला पळवून आणले त्यास सोडून येण्यास सांगूनही मुलाने न ऐकल्याने समाजात बदनामी होईल म्हणून बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाने पुणे जिल्ह्यातील भीमा नदीपात्रात आत्महत्या केली. मयतांमध्ये आई, वडील, मुलगी,जावाई आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. ही सामुहिक आत्महत्येचा प्रकार आहे की, आणखी काही? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात प्रथम दोन मृतदेह आढळून आले. यानंतर पुन्हा दोन असे दोन महिला,दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने शोध घेतला असता आज तीन मुलांचे मृतदेह आढळले आहेत. हे सर्वजण कामधंदा साठी दौंड तालुक्यातील निघोज गावात रहात होते. शामराव पंडित फुलवरे, राणी शामराव फुलवरे, मोहन उत्तम पवार, संगीता मोहन पवार, रितेश शामराव फुलवरे, कृष्णा फुलवरे, छोटू फुलवरे अशी मयताची नावे आहेत. मोहन पवार हे गेवराई तालुक्यातील रहिवासी असून फुलवरे हे बीड तालुक्यातील रहिवासी आहेत. मोहन पवार व शामराव फुलवरे हे नात्याने सासरे-जावाई असून, रितेश, कृष्णा,छोटू ही तीन मुले मोहन पवार यांचे नातू आहेत. मोहन पवार यांच्या मुलाने एक महिला पळवून आणली होती. तीस सोडून येण्यासही मोहन पवार यांनी सांगितले होते. परंतु त्याने ऐकले नाही. समाजात आपली बदनामी होणार अशी त्यांना भीती वाटत होती. या बाबतीत मोहन पवार यांनी पुणे येथील मुलाला फोन करून याबाबत माहिती देऊन तुझ्या भावाला ती महिलेला तिच्या घरी सोडून येण्यास सांग नाहीतर आम्ही विष घेऊन आत्महत्या करु असे सांगितले होते. यानंतर ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. हे सर्व मृतदेह दि. १८ ते २४ या काळात भीमा नदीत आढळे. यामुळे हा सामुहिक आत्महत्येचा प्रकार आहे की, वेगळे काही? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. पोलीस तपासात ते निष्पन्न होईल. परंतु या घटनेने बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.