भवताली
आज केज येथे रिपाइं (ए) कडून संघर्ष मोर्चा

केज : तालुका रिपाइं ( ए ) कडून विविध मागण्यांसाठी संघर्ष मोर्चा आयोजित केला. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघणारा मोर्चा हा मंगळवार पेठ, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकणार आहे.
गायरान धारक, भूमिहीन यांच्या हक्कासाठी तसेच नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी रिपाइं (आठवले) गटाच्या वतीने केज तहसील कार्यालयावर आज भव्य संघर्ष मोर्चा निघणार आहे.