शिक्षण संस्कृती
प्रा. शहादेव वीर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

बीड : तालुक्यातील पाली येथील रहिवासी, साक्षळपिंप्री येथील उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक शहादेव भगवान वीर यांना राजे यशवंतराव होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने देण्यात येणारा यशवंत रत्न राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्य गृहात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व श्रीमंत भूषण राजे होळकर इंदोर, याच्या हस्ते दिला. हा पुरस्कार 24 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सेवा पूर्ण झालेल्या शिक्षककाना देण्यात येतो. यावेळी राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.