असू अन् हसू! अतिवृष्टी अनुदान कोणाला भेटणार? कोणाला वगळणार?
मागणी ८१० कोटींची शासनाने दिले ४१० कोटी

लोकगर्जनान्यूज
बीड : अतिवृष्टी अनुदान मिळणार की, नाही म्हणत आज राज्य शासनाने नुकसान भरपाई अनुदान घोषित केले. पण मागणी ८१० कोटींची होती अन् शासनाने ४१० कोटी २२ लाख दिले. ही रक्कम तोकडी असल्याचा सूर लावला जात असल्याने अनुदान मंजूर झाल्याचा आनंद आणि कमी असल्याचं दुःख यामुळे जिल्ह्याची अवस्था म्हणजे असू अन् हसू अशी दिसत असून ही रक्कम आता कोणाला मिळणार आणि कोणाला नाही अशी परिस्थिती होऊ नये.
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालत हातातोंडाला आलेलं घास हिरावून नेला. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रधान मंत्री पीक विमा उतरवलेला असला तरी कंपनीच्या अटी व नियम पुर्ण करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे पिका प्रमाणे विमा रक्कम खात्यावर जमा झाल्या शिवाय त्याचं खरं नाही. यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या अनुदान कधी मंजूर होणार याकडे लक्ष लागले होते. पंचनामे झाले, जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या दोन बैठका झाल्या परंतु निर्णय काहीच नाही. अनुदान मिळणार की, नाही? असा प्रश्न पडला होता. तर जिल्हाधिकारी यांनी सहा लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्याने बीड जिल्ह्याला ८१० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. परंतु आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने बीड जिल्ह्यासाठी मागणीच्या तुलनेत अर्धाच म्हणजे ४१० कोटी २२ लाखांचा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर केला. यामुळे हा निधी आता कसा वाटप करावं अन् कोणाला मिळणार, कोणाला नाही. असा सूर लावला जात आहे.