केज येथे स्वच्छता अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते थाटात शुभारंभ

नगराध्यक्षा सौ.सिता बनसोड, हारुण इनामदार यांनी हातात झाडू घेऊन केली स्वच्छता
केज : स्वच्छता सर्वेक्षण २०२२ अंतर्गत केज नगरपंचायत सहभागी झाली असून आज सोमवारी संत गाडगेबाबा स्वच्छता पंधरवडा अभियानाचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. तसेच नगराध्यक्षा सौ. सिता बनसोड व जनविकास आघाडीचे प्रमुख हारुण इनामदार यांच्या सह आदि नेत्यांनी हातात झाडू घेऊन प्रत्येक्ष स्वच्छता अभियान राबविले आहे.शहराला लोकसहभागातून स्वच्छ व सुंदर करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने स्वच्छता सर्वेक्षण २०२२ राबविण्यात येत आहे. यामध्ये केज नगरपंचायत सहभागी झाली. शहराला स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर सोमवारी ( दि. १४ ) शहरात संत गाडगेबाबा स्वच्छता पंधरवडा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी सुरेश पाटील, नगराध्यक्षा सौ.सिता बनसोड, जनविकास आघाडीचे प्रमुख हारुण इनामदार, तहसीलदार दुल्हाजी मेंडके, पशुपतीनाथ दांगट, तालुक्यात आरोग्य अधिकारी सह आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत स्वचछतेची सुरवात घरा पासून करण्याचे आवाहन शहर वासियांना केले.