क्राईम
अल्पवयीन मुलीचे अपहरण! केज तालुक्यातील घटना

केज : तालुक्यातील एक अल्पवयीन मुलीगी पाणी आणण्यासाठी गेली. ती अद्याप घरी न आल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.
रविवार ( दि. १७ ) दुपारी १२ च्या सुमारास पाणी आणण्यासाठी जाते म्हणून १६ वर्षीय मुलगी घरा बाहेर पडली. उशीरा पर्यंत ती घरी परत न आल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी शोध घेतला; परंतु ती कुठेही आढळून आली नाही.मुलीच्या भावाने (दि. १९ ) पोलीसात फिर्याद दिली. त्यावरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पिंपळे घटनेचा तपास करीत आहेत.