क्राईम
अज्ञात वाहनाच्या धडकेत धारुर तालुक्यातील दुचाकीस्वार ठार

लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : तेलगाव येथून आपल्या गावी जात असलेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना रविवारी ( दि. २२ ) रात्री १० च्या सुमारास घडली आहे.
कृष्णा सुदाम तिडके रा. बोडखा ( ता. धारुर ) असे मयताचे नाव आहे. कृष्णा रविवारी ( दि. २२ ) रात्री १० च्या सुमारास तेलगाव येथून बोडखा या आपल्या गावी दुचाकी क्र. MH 44 J 4636 वरुन जात होता. यावेळी कारी ते तेलगाव दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये जबर मार लागून कृष्णा तिडके जागीच ठार झाला. सदरील घटना गावात समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे.