अखेर झुंज संपली! बीड जवळील अपघातातील जखमी ऋतुजा झंवरचे निधन

लोकगर्जना न्यूज
अंबाजोगाई : येथील झंवर कुटुंबाचे ३० सप्टेंबरच्या पहाटे बीड जवळ अपघात झाला. यामध्ये आई ठार तर मुलगी व पिता जखमी होते. मुलीवर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. ती मागील १० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. अखेर झुंज संपली असून ऋतुजा झंवरचे निधन झाले आहे. या बातमीने झंवर कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळा आहे.
अंबाजोगाई येथील होलसेल केमिस्ट विक्रेते जितेंद्र झंवर हे पत्नी,मुलगी असे तिघे कारने औरंगाबाद येथे गेले होते. काम संपवून रात्री उशिरा औरंगाबाद येथून अंबाजोगाईला परत येताना धुळे-सोलापूर महामार्गावर बीड शहरापासून जवळ कोळवाडी फाटा येथे त्यांची कार क्रं. एम. एच. ४४ एस २९९० ही ट्रकच्या पाठीमागून जोरात जाऊन धडकल्याने घडलेल्या अपघातात ज्योती जितेंद्र झंवर या जागीच ठार झाल्या तर मुलगी ऋतुजा जितेंद्र झंवर व स्वतः जितेंद्र झंवर हे दोघे जखमी झाले. ऋतुजा झंवर या गंभीर जखमी असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. औरंगाबाद येथे मागील दहा दिवसांपासून ऋतुजा मृत्यूशी झुंज देत होती. अखेर ही झुंज अपयशी ठरली असून, उपचारादरम्यान ऋतुजा झंवर यांचे निधन झाले आहे. या घटनेने झंवर कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळा आहे. अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.