पिंपळनेर येथे मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत मुलींना माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
पिंपळनेर येथील शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लिंबाजी कानडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य तथा उपसरपंच राजेश गवळी, पालक श्रीकांत ठोकरे, मच्छिंद्र साठे, शहादेव जाधव सह आदी उपस्थित होते. भाजपाचे कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य, उपसरपंच राजेश गवळी यांच्या वतीने हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना वही, पेन सह आदी साहित्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आव्हान यावेळी मान्यवरांच्या वतीने करण्यात आली. कार्यक्रमाला शिक्षक नवनाथ कुरवडे, शेख अमजद, परमेश्वर जाधव, पद्मिनी घोलप, उमेश ठोकरे, भागवत ठोकरे, बळीराम मेहत्रे, प्रदिप आनेराव सह विद्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.