क्राईम
अंबाजोगाई-बर्दापूर रस्त्यावर पुन्हा अपघात; नादुरुस्त ऊसाच्या ट्रॅलीला इनव्हा व दुचाकीची धडक

लोकगर्जना न्यूज
सकाळीच या मार्गावर अपघात होऊन ७ ठार तर १० जण जखमी झाल्याची घटना घडली. यानंतर रात्री १० च्या सुमारास याच अंबाजोगाई-बर्दापूर रस्त्यावर अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
पंचर झाल्याने ऊसाची ट्रॅली रस्त्यावर उभी होती. त्यास रिफ्लेक्टर ( रेडियम ) नसल्याने इनव्हा गाडीच्या चालकाला लक्षात न आल्याने ती सरळ पाठी मागून ट्रॅली खाली घुसली. यानंतर एक दुचाकी ही ट्रॅलीच्या खाली घुसली. यामध्ये इनव्हा व दुचाकीचे नुकसान झाले आहे. तसेच अपघातग्रस्तांना मदत करत तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. परंतु यामध्ये नेमके किती जण जखमी आहेत हे समजु शकले नाही.