अंबाजोगाई -केज रस्त्यावर एसटीची दुचाकीला धडक; एक ठार,दोन जखमी

अंबाजोगाई : अंबाजोगाई-केज रस्त्यावर लोखंडी सावरगाव जवळ पुन्हा एसटी आणि दुचाकीचा अपघात घडला. यामध्ये एकजण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ( दि. १८ ) दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, मयत संजय अंकुश डहाणे ( वय ५० वर्ष ) रा. कोद्री ( ता. अंबाजोगाई ) हे दुचाकीवरून अंबाजोगाई येथे जाताना इतर दोघे सोबत होते. दरम्यान लोखंडी सावरगाव जवळ ते असताना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने अपघात घडून तीन संजय अंकुश डहाणे, रविंद्र दगडु जाधव, बालासाहेब शेषेराव कदम हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून तिघांनाही अंबाजोगाई येथे सरकारी दवाखान्यात दाखल केले. येथे उपचारादरम्यान संजय डहाणे यांचा मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या मार्गावर वाढते अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी प्रशासन व शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.